!-- WhatsHelp.io widget -->
त्र्यंबकेश्वर नाशिक जवळ असलेले केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. भारतातील बारा ज्योतीर्लीगांपैकी एक असलेल.
महाराष्ट्रातील नाशिकपासून २८ कि.मी. अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हे स्थान आहे. दक्षिण गंगा म्हणून ज्या नदीचा उल्लेख केला जातो ती गोदावरी नदी येथेच उगम पावते.
या ठिकाणी गौतमी गंगेचे उगमस्थान असून औदुंबराचे मुळाजवळ प्रथम गंगा उत्पन्न झाली व ती गोमूखातुन वाहत असते. तेथे गंगेचे व शंकराचे मंदिर आहे. थोड्या अंतरावर शिवजटा मंदिर पण आहे.
रम्हगिरी पर्वतावर जाण्यास ५०० पायर्या आहेत. येथून गोदावरी नदी तीन दिशेला वाहते.पूर्वेस वाहणार्या नदीला गोदावरी म्हणतात, दक्षिणेकडे वाहणार्या नदीला वैतरणा म्हणतात आणि पश्चिमेकडे वाहणार्या नदीला पश्चिम गंगा म्हनतात.
हा पर्वत १८०० फूट उंच आहे. याची समुद्र सपाटी पासून उंची ४२४८ फूट आहे. या सद्यो जटा, वामदेव, अघोरा, ईशाणा आणि तत पुरूशा असे पाच सूळे आहेत. याना शिवाची पाच मुखेही म्हणतात.
ब्रम्हगिरीच्या रस्त्यामधे गंगाद्वार आहे. इथे गंगेचे मंदिर आहे ज्याला आता गोदावरी नदी म्हनतात.येथेच गोदावरी नदीचा उगम झाला. येथे जवळच गोरक्षणाथ गुंफा,१०८ शिवलिंग व राम लक्ष्मण तीर्थ आहेत.
गंगाद्वार येथे जाण्यास ७००पायर्या आहेत. येथे गंगेची मूर्ती आहे . तिच्या पायथ्याला गाईच्या डोक्याच्या आकाराचा दगड आहे ज्याच्या मुखातून थेंब थेंब पाणी झिरपते.
Pandit Deepak Guruji at Trimbakeshwar. for more details call us:
+91 99606 37883 | poojat3866@gmail.com